आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 48 तासांत मुसळधार, मराठवाडा, विदर्भात चांगल्या पावसाची नोंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यातून मार्ग काढताना शाळकरी मुली. - Divya Marathi
मुंबईत रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. त्यातून मार्ग काढताना शाळकरी मुली.
पुणे - नैऋत्य मोसमी पावसाने शनिवारी राज्यभरात बहुतेक सर्व ठिकाणी हजेरी लावली. कोकण, घाटमाथ्यावर सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली. येत्या ४८ तासांतही राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल अरबी समुद्राच्या उत्तरी भागात, गुजरात, मध्य प्रदेश तसेच राजस्थानातील काही भागांत होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचे वेधशाळेचे निरीक्षण आहे. २६ जून रोजी कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून त्यामुळे येत्या ४८ तासांत राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

पुढे वाचा, मुंबईत धुवाधार, चौपाट्या गर्दीने फुलल्या...
बातम्या आणखी आहेत...