आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: निसर्गाचा कहर, काश्मीर खोरे नव्हे; हे आहे मराठवाड्यातील चित्र...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला आहे. मराठवाड्याला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. येथे अर्धा किलोच्या बर्फाच्या गारा पडल्याचे दिसून आले. कायम दुष्काळात पिचलेल्या मराठवाड्यात सर्वत्र बर्फच बर्फ दिसून येत होता. रस्ते, शेतात, घरांवर, मैदान सगळीकडे बर्फच बर्फ त्यामुळे हा दुष्काळी मराठवाडयाचा भाग नसून काश्मीरमधील नजारा लोकांना पहायला मिळत आहे.
औरंगाबादसह जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, अहमदनगर, इंदापूर, बारामती भागाला गारपीट व वादळी पाऊस वा-याचा तडाखा बसला आहे. यात जिवीतहानी झाली. राज्यात आतापर्यंत 15 ते 20 लोक दगावल्याची माहिती आली आहे. याचबरोबर किमान 500 जनावरे दगावल्याची माहिती आहे. शेतक-यांची पिके जमीनदोस्त झाली असून, आंबा, द्राक्षे, दाळिंब, कापूस, गहू, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या आठवडयाभरापासून मराठवाड्यासह राज्याला अवकाळी पावसाने व गारपीटीने झोडपून काढले आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांचे किमान 12 ते 17 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. निवडणुका महिन्याभरावर आल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांनी या भागाला भेट देण्याचा सपाटा लावला आहे. मात्र, उद्धवस्त झालेल्या शेतक-यांना मदत मिळणार का आणि किती, कधी व कशी मिळणार हा प्रश्न गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. त्यामुळे रब्बीचा हंगाम वाया गेला होता. आता खरीपाची पिके जोमात होती मात्र गारपीटीने ते नष्ट करून टाकली आहेत. शेतक-यांसाठी रब्बीसह खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
काश्मीर खो-याची आठवून करून देणा-या या गारपीटीची खास छायाचित्रे पाहा...