आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरअखेर १६ टक्के अधिक पावसाची नोंद; राज्यातील १४ जिल्ह्यांत अतिवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या राज्यावर यंदा वरुणराजाने कृपा केली असून सप्टेंबरअखेर राज्यात सरासरीच्या १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जून ते सप्टेंबर २०१६ या चार महिन्यांच्या काळात राज्यातील १४ जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. १९ जिल्ह्यांत पावसाने सरासरी गाठली आहे. विशेष म्हणजे भरपूर पावसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात यंदा मात्र तब्बल २४ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. शिवाय परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र बरसत असल्याने पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाने सरासरी ओलांडली आहे. कोकणात उत्तम पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्याचा अपवाद वगळता विदर्भातही पावसाने समाधानकारक चित्र उभे केल्याचे हवामान खात्याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...