आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात दीड तासात 103 मिलीमीटर पाऊस, नागरिकांनी अनुभवला सुखद गारवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे दीड तास झालेल्या पावसाची 103 मिलीमीटर इतकी नोंद झाली. एकीकडे जोरदार पाऊस पडत होता तर दुसरीकडे ढगांचा गडगडाट व सुसाट वेगाचा वाराही वाहत होता. त्यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे चित्र होते. पिंपरी-चिंचवड परिसरासह सासवड भागातही जोरदार पाऊस पडला. सुसाट वा-यांमुळे व झाडे पडल्याने अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत लाईट नव्हती. पुणे-लोणावळा लोकलही उशिरा धावत होत्या. असे असले तरी मागील काही दिवसापासून उकाड्यापासून हैराण झालेल्या पुणेकरांना यंदाच्या मोसमात पहिल्यादांच सुखद गारवा अनुभवायला मिळाला.
मागील आठवड्यापासून पुण्यात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने राज्यातील काही भागात गारपीट होण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, पुण्यातील काही भाग वगळता व बारीक पाऊस सोडता पाऊस पडत नव्हता. दुसरीकडे, उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे पाऊस पडू शकतो अशी शक्यता होती. अखेर बुधवारी दुपारपासून शहरात ढगांनी गर्दी केल्याचे चित्र होते. सायंकाळी साडेसहा सातनंतर मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री आठ-साडेआठ पर्यंत पाऊस पडत होता. सायंकाळी पाऊस पडल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. औंध, सहकारनगर, कात्रज, विद्यापीठ परिसरात अनेक झाडे पडल्याचे दिसून आले. पुण्याच्या जवळ सासवड भागातही दुपारी चार नंतर जोरदार पाऊस पडला.
पुढे पाहा, पावसाची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...