आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ८२ मि.मी.ने सलामी, औरंगाबादेत दुप्पट पाऊस; आतापर्यंत १२२ मिमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे /औरंगाबाद - दरवर्षी जूनला मुंबईकरांना भिजवून काढणारा नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) यंदा पाच दिवस उशिरा म्हणजे शुक्रवारी मुंबापुरीत आला. पहिल्याच दिवशी मान्सूनने मुंबईला ८२ मि.मी.ची सलामीही दिली. सह्याद्री ओलांडून तो पुण्यातही आला आहे. दरम्यान, १४ जूननंतर २४ तासांत राज्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मान्सूनने शुक्रवारी सह्याद्री डोंगररांगा ओलांडून मध्य महाराष्ट्रात प्रवेश केला. डहाणू, पुणे, कोल्हापूर अशी सध्याची मान्सूनरेषा आहे. अरबी समुद्र, पूर्व कर्नाटकातही मान्सूनची आगेकूच झाली. जूनला तळकोकणात आल्यावर हा प्रवास अडखळला होता. उत्तर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे प्रवासाला गती मिळाली. खान्देश, उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पसरण्यासाठी हवामान अनुकूल असल्याचे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.
मराठवाडा, विदर्भातही अतिवृष्टीचा इशारा
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रकानुसार १४ जूनला सकाळपासून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत जोरदार पाऊस होऊ शकतो. बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम येथेही जोरदार वृष्टी होऊ शकते. सर्व जिल्हाधिकारी कार्यालये तसेच रेल्वे प्रशासनाने याची नोंद घ्यावी, असेही पत्रकात म्हटले आहे.
औरंगाबादेत आतापर्यंत १२२ मिमी
मृग नक्षत्रात हजेरी लावलेल्या पावसाने यंदा औरंगाबादेत गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वर्षाव केला. मृगापासून १२ जूनपर्यंत गतवर्षी जिल्ह्यात सरासरी ३० मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा हे प्रमाण ६४ मिमी इतके आहे. पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज असल्याने जूनमध्ये पावसाची सरासरी वाढण्याचा अंदाज आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६७५ मिमी असून आतापर्यंत जिल्ह्यात १२२ मिमी इतका पाऊस झाला आहे.

पावसाची सरासरी (अाकडेवारी मि. मी. मध्ये)
यंदाची आतापर्यंतची सरासरी 64.55.88
गतवर्षी १२ जूनपर्यंतची सरासरी 30.30
औरंगाबादचा पाऊस असा...
११ जून २०१५ झालेला पाऊस 27.29
११ जून २०१४ झालेला पाऊस 0.26
स्वस्त बियाण्यांवरून विरोध, कंपन्या कोर्टात
बीटी कपाशीच्या बियाण्यांचे दर १०० रुपयांनी कमी करण्याच्या निर्णयाला बियाणे कंपन्यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.
अाता पतसंस्था देणार शेतकऱ्यांना कृषिकर्जे
पतसंस्था बिगर शेती पतसंस्था शेतीला कर्जे देऊ शकतील. २१ हजार पतसंस्था राज्यात असून, तारणाच्या २० टक्के कर्ज देऊ शकतील.
बातम्या आणखी आहेत...