आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Help Of 70 Lakh Rupees Declared To NAAM In Sahitya Sammelan

माजी अध्यक्षांना प्रत्येकी १ लाख, ‘नाम’साठी ७० लाख, स्वागताध्यक्ष, संयाेजकांची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्यानबा- तुकाराम साहित्यनगरी - ग्रंथदिंडीने थाटात प्रारंभ झालेल्या पिंपरीतील ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्याच दिवशी अाजवरच्या माजी संमेलनाध्यक्षांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात अाला. तसेच या सर्वांना प्रत्येकी एक लाख रुपये कृतज्ञता निधी देण्याची घाेषणा स्वागताध्यक्ष डाॅ. पी.डी. पाटील यांच्या वतीने करण्यात अाली. तसेच विदर्भ व मराठवाड्यातील अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा शिक्षणासाठी ‘नाम’ फाउंडेशनला ७० लाखांची मदत देणार असल्याची घाेषणाही संमेलनाचे संयाेजक सचिन इटनकर यांनी केली. टाळ्यांच्या गजरात या दाेन्ही घाेषणांचे स्वागत करण्यात अाले.

डाॅ. यु. म. पठाण, मधु मंगेश कर्णिक, डाॅ. द. भि. कुलकर्णी, डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. फ. मुं. शिंदे, विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर पानतावणे, शेषराव मोरे आदींचा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यमान संमेलनाध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे, नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, अमेरिकेतील मराठी साहित्यिक श्रीनिवास ठाणेदार आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी सर्व माजी संमेलनाध्यक्षांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला खासदार अमर साबळे, आमदार नीलम गोऱ्हे, काँग्रेस नेते उल्हास पवार आदींची उपस्थिती होती. तो धागा पकडत द. भि. कुलकर्णी यांनी संमेलनात सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या सहभागाबद्दल आपल्याला क्लेश होत असल्याचे सांगितले. साहित्यिक आणि सत्ताधीश हे वीणेच्या दोन तारांसारखे असतात. त्यात अंतर असलेच पाहिजे, असा सूर त्यांनी लावला.

शिंदेंनी सावरले
नियोजित संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाचा धागा पकडत माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘साहित्यिकही मजेदार असतात. कधी ते हसवतात, कधी रडवतात, तर कधी एका फटकाऱ्याने वाद निर्माण करतात.’’ त्यांच्या या वक्तव्यावर मंडपात हशा उसळला. त्यावर ‘जे तुमच्या मनात आहे, ते माझ्या मनात नाही’, असे म्हणत शिंदेंनी पुन्हा हशा मिळवला. सबनीसही त्यात सहभागी झाले हाेते.