आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमित्त कातकऱ्यास दिला राेजगाराचा अाधार; विद्यार्थ्यांनाही मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- दिवाळी सण हा प्रत्येकाच्या जीवनात अानंदाचे क्षण निर्माण करणारा असताे. शहरी भागात धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली जाते. मात्र, दुर्गम भागातील मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या काही लाेकांना परिस्थितीमुळे अाजही दिवाळी  अानंदाने साजरी करता येत नाही. राेजगार, शिक्षणानिमित्त पुणे शहरात जाण्यासाठी लाेणावळा -पुणे या लाेकलने दरराेज प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय तरुणांच्या ‘शेअरिंग स्माईल’ या ग्रुपने सार्थक दिवाळीची खूणगाठ मनाशी बांधत, दिवाळीच्या निमित्ताने मागासलेल्या एका कातकरी कुटुंबास चार शेळ्या व एक बाेकड भेट देऊन त्यांना राेजगारासाठी अाधार दिला अाहे. अशा प्रकारे अनाेखी दिवाळी साजरी करत नवीन अादर्श प्रस्थापित केला अाहे.   

शेअरिंग स्माइइलचे सदस्य सूरज दिघे यांनी सांगितले की, लाेणावळा-पुणे यादरम्यान दैनंदिन लाेकलने प्रवास करत असताना २५ ते ३० जणांचा अामचा एक गट तयार झाला अाहे. काही वर्षांपूर्वी दिवाळीदरम्यान सर्वांना सुट्या असल्याने या काळात समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करावे असा विचार पुढे अाला व त्यातून सर्वांनी ठरावीक रक्कम जमा करत विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मिठाई वाटप, फटाके वाटप, धान्य वाटप असे उप्रकम राबवले. मात्र, त्यानंतर गरजू लाेकांना छाेटासा जाेडधंदा चालू करून देण्याबाबत विचार करावा, असे प्रकर्षाने जाणवले. त्यातूनच या वर्षी मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरातील काेळे चाफेकर येथील कातकरी वस्तीतील चंदू वाल्हेकर यांच्या कुटुंबीयांचा अभ्यास करून त्यांची गरज लक्षात घेऊन दिवाळीनिमित्त चार शेळ्या व एक बाेकड घेऊन देण्यात अाले. यामधून त्यांना लेंडीखत, दुग्धव्यवसाय करता येऊ शकेल. तसेच भविष्यात नवीन शेळ्यांची पैदास हाेऊन कुटुंबीयांना राेजगाराचे हमखास साधन उपलब्ध हाेईल. 

मुलांना गणवेश वाटप
शेअरिंग स्माइलच्या वतीने मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील काेटमवाडी येथील ४३ कुटुंबांत व जांबुळणे येथील १८ कुटुंबांना एक महिन्याचा किराणा वाटप करण्यात अाला. काेटमवाडीतील ४२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटपही करण्यात अाले. तर तळेगावातील वानप्रस्थाश्रम येथील वृद्धाश्रमात अाजी-अाजाेबांसाेबत तरुणांनी एक दिवस दिवाळी साजरी केली. इंदाेरी येथील अंध मुलांचे वसतिगृह व तळेगावातील जीवनधारा मतिमंद मुलांच्या शाळेत दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात अाले.    
बातम्या आणखी आहेत...