आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवा सेनेच्या अध्यक्षाला पुण्याजवळ गोळया घातल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - हवेली तालुक्यातील वडकी येथे शिवसेना अंतर्गत असलेल्या युवा सेनेच्या अध्यक्षाची अज्ञात इसमांनी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. हेमंत गायकवाड (वय ३०) असे मृताचे नाव आहे. राजकीय वैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

हेमंत गायकवाड याचा वडकी येथे सुरक्षारक्षक पुरविण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी तो फोटो काढण्यासाठी स्टुडिओत चालला होता. त्याच वेळी पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या व पलायन केले.

काही महिन्यांपूर्वी मनसेचा मावळ तालुका अध्यक्ष बंटी वाळुंज याची कामशेतजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या पाठोपाठ ३ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक अविनाश टेकवडे यांची त्यांच्या घराजवळ भरदिवसा भोसकून हत्या करण्यात आली. मावळ तालुक्यातील आढे गावचे नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब केदारी यांचीही गळा चिरून हत्या करण्यात आली होती.