आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Her Ambition : Latabai Now Happy, Treatment On Her Hasband Starts In Pune

जिद्द तिची: लताबाई यांची यंदाची संक्रांत गोड,पतीवर पुण्यात उपचार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - आजारी पतीच्या उपचारासाठी कडाक्याच्या थंडीत अनवाणी धावून मॅरेथॉन स्पर्धा जिंकणार्‍या 65 वर्षीय लताबाई करे यांची यंदाची मकरसंक्रांत खर्‍या अर्थाने गोड झाली आहे. त्यांचे वृद्ध पती भगवान यांच्यावर पुण्यातील एका धर्मादाय रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळो, अशीच प्रार्थना त्यांनी देवाकडे केली आहे.
दैनिक ‘दिव्य मराठी’ने लताबाईंची व्यथा मांडल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी लाखो हात पुढे आले. मात्र, या माउलीचे बँक खातेही नव्हते. खाते उघडल्यानंतर आजवर त्यांच्या खात्यात 2 लाख 70 हजार रुपये जमा झाले असून अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. मॅरेथॉन स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाच्या तब्बल पन्नासपट रक्कम लताबाईंच्या खात्यात जमा झाल्याने बर्‍याच अंशी त्यांची अडचण दूर झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी 15 डिसेंबर रोजी बारामती येथे एका मॅरेथॉन स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात लताबाई जिद्दीने अनवाणी धावल्या आणि आपल्या कुंकवासाठी जिंकल्या. ‘दिव्य मराठी’च्या बातमीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी लताबाईंचा सत्कार केला. मात्र, प्रत्यक्षात रुग्णालयापर्यंत त्यांना घेऊन जाण्यास कोणीही पुढे आले नाही. लताबाई या बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरवण्यासाठी त्या बारामतीत स्थिरावल्या आहेत. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप यांनी लताबाई करे यांना मुंबईला बोलावून 50 हजार रुपयांची मदत केली.
दैनिक ‘दिव्य मराठी’ची संकटात साथ
दैनिक ‘दिव्य मराठी’ने बातमी प्रकाशित करताच मदत सुरू झाली. त्यानंतर अडचणींवर मात करत बँकेत खाते उघडले. पैसे मिळाल्याने आमची गरिबी दूर करण्यात ‘दिव्य मराठी’ची मोठी मदत झाली. मुलाच्या पगारावर पैसे मागे पडत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर (पती-भगवान करे) उपचार करता येत नव्हते. बातमी आल्यानंतर अनेक मोठय़ा माणसांचे फोन आल्याचे लताबाई करे यांनी सांगितले.