आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूरतच्या अाराेपीकडून पुण्यात ५३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका अाराेपीस पाेलिसांनी अटक केली. विशाल पाेपटभाई पटेल (वय २७, मूळ राहणारा सुरत) असे अाराेपीचे नाव असून त्याच्याकडून ५३ लाख रुपयांचे ४२० ग्रॅम हेराॅइन जप्त करण्यात अाले अाहे. काेर्टाने त्याला सात दिवसांची काेठडी सुनावली.

अाराेपी विशाल पटेलविराेधात सिंहगड पाेलिस ठाण्यात एनडीपीसी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ताे एक वर्षापासून पुण्यातील नऱ्हे भागात किरायाने फ्लॅट घेऊन राहत हाेता. टाइल्स विक्रीच्या व्यवसायात अपयश अाल्याने त्याने साथीदाराच्या मदतीने अमली पदार्थांची छुपी विक्री सुरू केली हाेती. पुणे- बंगळुरू रस्त्यावरील नवले पुलाजवळ संशयित लाेक अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार हा सापळा रचून अाराेपीला अटक करण्यात अाली. अाराेपी विशालच्या ताब्यातून ५३ लाख किमतीचे हेराईन जप्त करण्यात अाले अाहे. त्याने सदर अमली पदार्थ मुंबईतून अाणल्याची कबुली दिली अाहे. विशालचा एक नायजेरियन साथीदार मात्र फरार झाला अाहे. पाेलिस त्याचा व इतर संशयितांचा शाेध घेत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...