आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावळ गाेळीबार; संदीप कर्णिकांवर कारवाईचे अादेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मावळ गाेळीबार प्रकरणात पुणे ग्रामीणचे तत्कालीन पाेलिस अधीक्षक संदीप कर्णिक यांची पुन्हा चाैकशी करून कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दिले.
(फाइल फोटो )
कर्णिक यांच्या गोळीने अांदाेलक कांताबाई ठाकर यांचा मृत्यू झाल्याचे बॅलेस्टिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालाचा तपासात विचार का केला नाही? असा सवाल करत न्यायालयाने कर्णिक यांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी याेजना राबवली जाणार हाेती. याला मावळ तालुक्यातील शेतक-यांचा विराेध हाेता. भारतीय किसान माेर्चा, भाजप, शिवसेना व रिपाइं व शेतकऱ-यांनी ९ अाॅगस्ट २०११ राेजी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बऊर येथे अांदाेलन केले हाेते. अांदाेलन हिंसक झाल्याने पाेलिसांनी केलेल्या गाेळीबारात कांताबाई ठाकर, माेरेश्वर साठे व श्यामराव तुपे या तीन शेतक-यांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर सरकारने चाैकशी अायाेग नेमला हाेता. दरम्यान, याप्रकरणी अाय. जी. खंडेलवाल यांनी याचिका दाखल केली हाेती.