आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात पकडलेला माअाेवादी ‘हायप्राेफाइल’; आज कोर्टात हजर करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात नुकतीच अटक करण्यात अालेला माओवादी के. मुरलीधरनची ‘हायप्रोफाइल’ पार्श्वभूमी पाहून पोलिस यंत्रणा चक्रावून गेली आहे. हा मुरलीधरन कोणी किरकोळ माओवादी नसून आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी असल्याची माहिती पाेलिसांतील सूत्रांनी दिली.

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या ‘टीप’वरून पुणे ‘एटीएस’ने गेल्या आठवड्यात मुरलीधरनला तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले. शुक्रवारी (ता. १५ मे) त्याला पुण्याच्या सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. ‘मोस्ट वाँटेड’ मुरलीधरनला गेली चार दशके जंग जंग पछाडणारी केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांमधली पोलिस पथके सध्या पुण्यात ठाण मांडून आहेत. मुरलीधरनला सध्या अभूतपूर्व बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे.
मुरलीधरनला मे रोजी कोर्टात दाखल करतानादेखील चोहोदिशांना कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कोर्टाचे आवार रिकामे करण्यात आले होते.
घर भाड्याने देणाऱ्यावर गुन्हा
जंगलग्रस्तभागांमधल्या पोलिस कारवाया वाढल्याने अलीकडच्या काळात माओवादी नक्षलवाद्यांनी शहरांमध्ये बस्तान बसवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच भाग म्हणून मुरलीधरन गेल्या वर्षभरापासून पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावरील तळेगावात दडून बसला होता. मध्यमवर्गीय वस्तीतल्या तीनमजली इमारतीत भाडेतत्त्वावर घेतलेल्या सदनिकेत मुरलीधरन राहात होता. या सदनिकेचा मालक श्रीपाद परांजपे पुण्याच्या सदाशिव पेठेत राहणारा असून त्याच्याविरुद्धदेखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चौकीजाळली
मुरलीधरनसुरुवातीपासूनच माओवादी विचारसरणीकडे आकर्षीत झाला. तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा सक्रिय सदस्यदेखील होता. याच संघटनेच्या कामासाठी तो काही वर्षे पॅरिसमध्ये राहिला. आणीबाणीच्या काळात कालिकतजवळच्या (केरळ) पोलिस चौकीवर हल्ला करून ती जाळल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेशातील माओवादी कारवायांमध्येही मुरलीधरनने महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. यामुळेच चार राज्यांचे पोलिस त्याच्या मागावर होते.
बातम्या आणखी आहेत...