आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • High Profile Sex Racket Busted In Koregoan Park, Pune

पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये हाय प्रोपाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कोरेगाव पार्क या उच्चभ्रू वसाहतीत सुरू असलेल्या हायप्रोफाइल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी शुक्रवारी पर्दाफाश केला. या वेळी दोन दलालांसह चार मुलींना अटक करण्यात आली. महेंद्र ऐनमोलार (रा. खडकी, पुणे) उमेश राम थापा (रा. बोपोडी चौक, पुणे) अशी दलालांची नावे आहेत.

फ्लॅट मालक अजय पाटील व अश्विन जगताप हे दोघे अद्याप फरार असून पुणे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. कोरेगाव पार्क येथे हायप्रोफाइल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उच्चभ्रू वसाहत असलेल्या गोल्ड फील्ड येथे छापा घालून चार मुलींसह दोन दलालांना अटक केली. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.