Home | Maharashtra | Pune | high profile sex racket busted in pune once again

पुणे: पंचतारांकित हॉटेलातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट पुन्हा एकदा उद्धवस्त, 2 तरूणी ताब्यात

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 10, 2017, 09:14 AM IST

पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आह

 • high profile sex racket busted in pune once again
  पुणे पोलिसांनी दोन तरूणींना ताब्यात घेतले आहे तर तीन दलालांना अटक केली आहे.
  पुणे- पुण्यातील सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे. यादरम्यान दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. मुंबई, पुण्यासह विविध हायप्रोफाईल मुलींना मोठ्या पैशांचे अमिष दाखवून अवैध वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली असता वरील दोन मुली ताब्यात घेतल्या. या रॅकेटमधील विपुल नावाच्या एजंटला पोलिसांनी अटक केली आहे. मागील महिन्यात 20 सप्टेंबर रोजी पुण्यातील विमाननगर परिसरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाप्रकरणी रशियन युवतीसह दिल्लीतील तीन मुलींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर 20 दिवसात आणखी सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.
  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे कर्मचारी नितीन तेलंगे यांना शिवाजीनगर परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलात विविध राज्यातील उच्चाभ्रू मुलींना मोठ्या रक्कमेचे व पैशांचे अमिष दाखवून वैश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. यात विपुल नावाचा एक एजंट आपल्या दलाल साथीदारांच्या देशभरातून मुली आणून पुण्यातील वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलात सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. हा दलाल ग्राहकांना फोनद्वारे माहिती देऊन हॉटेल त्या ग्राहकांच्या नावे हॉटेल बुक करायचा व नंतर तेथे मुली पुरवायचा.
  या शाखेतील कर्मचारी नितीन तेलंगे यांना याची माहिती मिळताच त्यांच्या विभागाने सापळा रचला. पोलिसांनी ग्राहकांद्वारे खातरजमा करून घेतली आणि त्यानंतर छापा टाकला. त्यावेळी दोन मुली आढळून आल्या. या दोन्हीही मुली सध्या मुंबईत राहतात. त्यातील एक मूळची मध्य प्रदेशातील तर दुसरी उस्मानाबादमधील आहे. त्यांना ताब्यात घेऊन दलाल विपुल, कृष्णा सिंग ऊर्फ यादव, विरू ऊर्फ अजय यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  ही कारवाई प्रदीश देशपांडे, पंकज डहाणे, संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील, शितल भालेकर, चंद्रकांत जाधव, नितीन तेलंगे, नामदेव शेलार, रमेश लोहकरे, नितीन लोंढे, गितांजली जाधव, सुप्रिया शेवाळे, रूपाली चांदगुडे, सरस्वती कागणे, सचिन शिंदे, प्रदीप शेलार, सचिन कदम, रेवनसिद्ध नरोटे, संदीप गिरी यांच्या पथकाने हा छापा टाकत कारवाई केली.
 • high profile sex racket busted in pune once again
  मागील महिन्यात 20 सप्टेंबर रोजी पुण्यातील विमाननगर परिसरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वेश्याव्यवसायाप्रकरणी रशियन युवतीसह दिल्लीतील तीन मुलींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर 20 दिवसात आणखी सेक्स रॅकेट उद्धवस्त केले आहे.

Trending