आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कल्याणी देशपांडेविरुद्ध गुन्हा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यातील पाषाण-सूस मार्गावर पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या सेक्स रॅकेटची मास्टरमाइंड कल्याणी देशपांडेसह तिच्या जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील 23 वर्षीय एका मॉडेलला काम देण्याचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोपही कल्याणी देशपांडेवर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण-सुस मार्गावरील 'खूशबू अपार्टमेंट'मध्ये राहणारी कल्याणी देशपांडे ही स्वत:च्या घरात राजरोसपणे कुंटनखाणा चालवते. मुंबईतील 23 वर्षीय एका मॉडेलला तिने काम देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरात डांबून ठेवले होते. पीडित तरुणींने खूशबू अपार्टमेंटमधून कसाबसा पळ काढून पोलिस स्टेशन गाठले आणि तिने पोलिसांना तिने आपबिती सांग‍ितली. त्यानंतर तिने तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यात कल्याणी देशपांडेचाही समावेश आहे.

कल्याणी देशपांडे हिच्याविरुद्ध अवैध मानव तस्करी केल्याप्रकरणीही अनेक गुन्हे दाखल आहे. या रॅकेटमध्ये अनेक बड्या लोकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या मार्गाने पोलिसांचा तपास सुरु आहे.

कोण आहे ही कल्याणी देशपांडे?
50 वर्षीय कल्याणी देशपांडे ही पुण्यातील एका कुंटनखाण्याची संचालक असून मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात तिचे नेटवर्क पसरले आहे. उल्लेखनिय म्हणजे ही तिच्या साथीदारांच्या मदतीने महत्वाकांक्षी आणि गरीब कुटुंबातील तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवते. त्यांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना बळजबरीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते. यातील मास्टरमाइंड कल्याणी देशपांडेविरुद्ध पोलिसात एक डझन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातील पोलिस सामाजिक सुरक्षा सेलने जून, 2012 मध्ये सेक्स रॅकेटचा भांडाफोड करून चार तरुणींची सूटका केली होती. त्यात दोन मुंबईच्या, एक कोल्हापुरची तर एक दिल्लीतील होती. दोन तरुणी या उच्चशिक्षित होत्या. त्यांना फाडफाड इंग्रजीही बोलता येत होते. या प्रकरणातही कल्याणी देशपांडेचे नाव समोर आले होते.

पोलिसांनी सांगितले की, सेक्स रॅकेट चालवणार्‍या व्यक्तीला दोन तासांचे 10 हजार ते 25 हजार रुपये मिळतात. त्यातील ते देहविक्री करणार्‍या तरुणीला पाच हजार रुपये प्रतिदिवसाच्या हिशेबाने देतात. अल्पवयीन मुलींना तर त्यापेक्षाही कमी रुपये दिले जातात.