आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 12 तरुणींना अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. शहारातील कोरेगावमधील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरु असलेला कुंटणखाना पोलिसांनी उद्‍धवस्त केला. 12 तरुणींसह पाच दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात दोन विदेशी तरुणांचा समावेश आहे. समाजसेवा शाखेच्या पथकाच्यामदतीने पोलिसांनी ही कारवाई केली.

कोरेगाव गाव पार्कमधील साऊथ मेन रोडवरील गोल्ड फिल्ड प्लाझा या इमारतीत तिसर्‍या मजल्यावर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकला. फ्लॅटमधील 12 तरुणींसह पाच दलालांना पोलिसांनी अटक केली. त्यात दोन तरुणी या विदेशी आहेत. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.