आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक सुरक्षा: ‘सीसीटीव्ही वॉच’मुळे पुण्यातील गुन्ह्यांवर वचक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पाच महिन्यांपूर्वी पुणे शहरात बसविण्यात अालेल्या १२५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाेलिसांना गुन्हेगारी राेखण्यात व कायदा माेडणाऱ्यांचा शाेध घेण्यात माेठ्या प्रमाणावर मदत हाेत अाहे. या माध्यमाून दाेषींविराेधात सबळ पुरावे मिळत असल्याने न्यायालयात दाेष सिद्धतेच्या प्रमाणात वाढ करण्यास पाेलिसांना मदत हाेणार अाहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने पाेलिसांनी पाच महिन्यातच पुण्यातील वाहतूक िनयमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात हजार केसेस नाेंदविल्या असून, त्यापैकी ५२७३ नागरिकांना नाेटिसा पाठवण्यात अाल्या अाहेत. तर १७२७ नागरिकांचे पत्ते िमळून अालेले नाहीत.
पुण्यातील शहरातील प्रमुख ४४० ठिकाणी १२५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अाले अाहे. अाॅगस्ट महिन्यात मुख्यमंत्री देवंेद्र फडणवीस यांनी या सीसीटीव्हीचे लाेकार्पण केले. त्यानंतर दैनंदिन शहरात घडणाऱ्या घडामाेडींवर पाेलिसांनी निर्माण केलेल्या स्वतंत्र सीसीटीव्ही कक्षाच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यावर ३० कर्मचारी लक्ष ठेवून त्याची नाेंद ठेवू लागले. वाहतूक िनयमांचे उल्लंघन, वाहनचाेरी, साेनसाखळी चाेरी, मारामारी, अपघात,महिलांची छेडछाड, शहरात बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नाेंद याबाबत सविस्तर दृश्य स्वरूपात माहिती जागेवर बसून पाेलिसांना िमळून कारवार्इ करणे सीसीटीव्ही फुटेजमुळे साेपे झाले अाहे.

गुन्हेगारीचे प्रमाण कमी करून दाेष सिद्धतेचे प्रमाण वाढविण्यास हाेणार मदत
४५० गुन्ह्यात फुटेजचा पुरावा
पुणे पाेलिस अायुक्तालयातील उपअायुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले की, शहरातील सीसीटीव्हीच्या मदतीने मागील पाच महिन्यांत रस्त्यावर घडणाऱ्या अनेक गुन्ह्याची नाेंद झाली असून त्यापैकी ४५० गुन्हे सिद्ध करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर न्यायालयात पुरावा म्हणून करण्यात अाला अाहे. शहरातील संस्था, व्यापारी यांनी रस्त्याच्या परिसरात लावलेले खासगी सीसीटीव्हीचे नेटवर्क पाेलिसांच्या नेटवर्कशी जाेडण्यात येत अाहे. शहरात महत्त्वपूर्ण उत्सवाच्यावेळी नेमण्यात अालेल्या पाेलिस बंदाेबस्तावेळी तसेच वाहतूक पाेलिसांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ही सीसीटीव्ही फायदेशीर ठरत अाहे. नुकताच नववर्षाच्या रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून केसेसही नाेंदविण्यात अालेल्या अाहेत.
इतर शहरातील पाेलिसांकडून चाैकशी
पुणे शहरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत झाल्यानंतर मुंबर्इ, नवी मुंबर्इ, ठाणे, नागपूर येथील पाेलिस अधिकाऱ्यांची पथके तसेच देशातील वरिष्ठ पाेलिस अधिकारी यांनी पुण्यातील सीसीटीव्ही यंत्रणा केंद्रास भेट देऊन कामकाजाची माहिती करून घेतली. सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार काेणत्याही गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज असल्यास त्याचा इलेक्ट्राॅनिक पुरावा म्हणून ग्राह्य मानला जाताे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजला महत्त्व प्राप्त झाले असून पाेलिसांच्या फुटेजच्या सीडीमध्ये काेणत्याही प्रकारे तांत्रिक बदल करता येऊ शकत नसल्याचे सीसीटीव्ही केंद्रातील सहायक पाेलिस िनरीक्षक माधुरी ताटे यांनी सांगितले.