आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Himayat Beg To Hanging To Death For Pune German Bakery Blast

पुणे जर्मन बेकरी स्फोट:फाशीची शिक्षा झाल्याचे ऐकताच बेशुद्ध झाला मिर्झा हिमायत बेग!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- कोरेगाव पार्क परिसरातील जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या मिर्झा हिमायत इनायत बेग याला पुणे सत्र न्यायालयाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा झाल्याचे ऐकताच हिमायत बेग कोर्टातच बेशुद्ध पडला. 'मी निर्दोष आहे' असे म्हणणारा हिमायत बेग कोर्टात ढसढसाही रडला होता. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्यानंतर आज (गुरुवारी) त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

पुण्यातील उच्चभ्रू व परदेशींचे वास्तव्य असलेल्या कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत 13 जानेवारी 2010 रोजी इंडियन मुजाहिदीनने बॉम्बस्फोट घडवला होता. त्यात 17 ‍निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता
या घातपाताप्रकरणी अटक झालेला एकमेव आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग (31, रा.उदगीर, जि.लातूर) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.पी.धोटे यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले होते. भादंवि कलम 302, 120 ब, 10 (अ) व (ब), बेकायदेशीर हालचाल प्रतिबंधक कायदा 16 (1) अ व सेक्शन 13 नुसार त्यास दोषी ठरवण्यात आले होते. कलमानुसार फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचाही अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. अखेर हिमायतला कोर्टाने गुरुवारी फाशीची ‍शिक्षा सुनावली.

बेगविरुद्ध 2607 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्याला 302 (खुन करणे), 307 (खुनाचा प्रयत्न), 153 (देशाविरुध्द युध्द पुकारणे), 435 (मालमत्ता नुकसान), 120 ब (गुन्ह्याचा कट रचणे), 474 (बनावट कागदपत्रांचा वापर), बेकायदा हालचाल प्रतिबंधक कायदा सेक्शन 10, 13, 16, 18 व 20 नुसार दोषी ठरवले होते.