पुणे- एका मुस्लिम तरूणाच्या हत्येसाठी जबाबदार असल्याच्या आरोपावरून सध्या तुरूंगात असणारा हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याचा पुण्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (रविवार 14 डिसेंबर) 'हिंदुत्व शौर्य पुरस्कार' देऊन गौरव करण्याचे ठरवले आहे. कर्नाटकमधील श्रीराम सेनेचे प्रमुख व वादग्रस्त व्यक्तिमत्त्व राहिलेल्या प्रमोद मुतालिक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. धनजंय देसाई सध्या तुरूंगात असल्याने त्याची पत्नी रसिका देसाई हा पुरस्कार स्वीकारणार असल्याचे कळते.
सात-आठ महिन्यापूर्वी पुण्यात महापुरुषांबद्दल
फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यानंतर चांगलाच तणाव निर्माण झाला होता. याचदरम्यान, मूळचा सोलापूरचा पण नोकरीनिमित्त हडपसर, पुणे येथे राहणा-या मोहसीन शेख या तरूणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येला धनजंय देसाईला जबाबदार धरले होते. मोहसीन शेख हा सॉफ्टवेअर कंपनीत काम करीत होता व त्याने महापुरुषांचा अवमान करणारे फोटो टाकल्याचा संशय देसाईच्या संघटनेला होता. त्यामुळे देसाईच्या संघटनेच्या टोळक्याने मोहसीनच्या हत्या घडवून आणल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी धनजंय देसाईसह सात जणांना तुरुंगात डांबले आहे. सर्व आरोपी हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते.
पुढे छायाचित्राच्या माध्यमातून पाहा, कोणी कार्यक्रम केला आहे आयोजित...