आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर पंचतत्त्वात विलीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, व्याख्याते आणि दुर्ग अभ्यासक निनाद बेडेकर यांच्या पार्थिवावर येथील वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. युवा अभ्यासक आणि इतिहासप्रेमींची मोठी उपस्थिती या वेळी होती.

बेडेकर यांचे रविवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कन्या नियती कॅलिफोर्नियाहून पुण्याला पोहोचल्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजता बेडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शासनाच्या वतीने बेडेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, इतिहासतज्ज्ञ सदाशिव शेवडे, पांडुरंग बलकवडे, डेक्कन कॉलेजचे कुलपती ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, निवृत्त हवाई दलप्रमुख भूषण गोखले, मोहन शेटे, मिलिंद एकबोटे, प्र. के. घाणेकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, इतिहास संशोधन मंडळाचे कार्यवाह श्री. भा. भावे, युवा संशोधक मंदार लवाटे, संभाजी भिडे गुरुजी, प्रकाशक अरुण जाखडे, देवयानी अभ्यंकर, माजी खासदार प्रदीप रावत, उदयसिंह पेशवे, दादा पासलकर, शाहीर हेमंत मावळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आदींनी बेडेकर यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली.

मंगळवारी श्रद्धांजली सभा
निनादबेडेकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी सहा वाजता मंडळाच्या पुण्यातील सभागृहात श्रद्धांजली सभा अायाेजित करण्यात अाली अाहे.