आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातही \'हिट अॅंड रन\': मद्यधुंद कारचालकाने 5 जणांना उडवले, तीन मित्रांचा जागीच मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर कारची झालेली अवस्था.... - Divya Marathi
अपघातानंतर कारची झालेली अवस्था....
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी जकातनाक्याजवळ एका मदयधुंद अवस्थेतील कारचालकाने 5 जणांना उडवले. यात दुचाकीवरील तिघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. कारचालकाने दारू पिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. वाहनचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
संकेत कमलाकर समेल (वय-23, मूळगाव खोपोली), शुभम संभाजी भालेकर (वय 23- मूळगाव पारनेर) आणि किरण दिलीप दहाणे (वय 24, मूळगाव सातारा) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तीन मित्रांची नावे आहेत. तर अविनाश बबन माने आणि शिनो जॉन हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण निगडीतील एका कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होते. याप्रकरणी मयूर रमेश घुमटकर (29, शाहूनगर, चिंचवड) या कारचालकाला अटक केली आहे. अपघात झाला तेव्हा मद्याच्या नशेत होता. तो पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.
निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री दीडच्या सुमारास हे सर्वजण निगडीतील भेळ चौकात चहा पित होते. त्यानंतर ते सध्या राहत असलेल्या वाल्हेकरवाडीकडे निघाले होते. त्याचवेळी निगडी जकातनाक्याजवळ मुंबईकडून येणा-या भरधाव कारने त्याना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर माने व शिनो जॉन गंभीर जखमी झाले. या दोघांना नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले. त्याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला कारचालक मयूर पळून जाण्याच्या बेतात होता. मात्र, नागरिकांनी त्याला चोप दिला व पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता त्याने मद्यप्राशन केल्याचे स्पष्ट झाले आहे. निगडी पोलिसांनी त्याच्यावर बेजबाबदारपणे व दारू पिऊन गाडी चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निगडी पोलिस ठाण्याच्या एपीआय ज्योती पाटील पुढील तपास करीत आहेत.
पुढे पाहा, अपघातानंतर वाहनांची झालेली अवस्था...