आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात मानाच्या गणपतींचे थाटात आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ढोल-ताशांचा दणदणाट, ध्वजपथके, लेझीमपथकांच्या शिस्तबद्ध मिरवणुका आणि हजारो गणेशभक्तांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा मंगलमय वातावरणात पुण्यनगरीत सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरोघरी गणरायांचे आगमन झाले. मानाच्या पहिल्या पाच गणपतींची प्राणप्रतिष्ठा विधिवत दुपारी बाराच्या आत करण्यात आली. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि अखिल मंडई मंडळ या गणेशांचीही प्रतिष्ठापना वाजतगाजत करण्यात आली.


पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. त्याचे पालन करत मानाच्या पाचही गणेशांची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तत्पूर्वी ढोलताशा लेझीम, ध्वजपथकांची शिस्तबद्ध संचलने या मिरवणुकांची वैशिष्ट्ये ठरली. काही ठिकाणी मानाच्या गणपतींवर पुष्पवृष्टीही करण्यात आली. मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या आकर्षक पायघड्या घालण्यात आल्या.


मान्यवरांच्या हस्ते पूजा
पुण्याचे ग्रामदैवत असणा-या श्री कसबा गणपतीची प्रतिष्ठापना सकाळी 11.16 वाजता औदुंबरचे मठाधिपती व्यंकटरमण दीक्षित यांच्या हस्ते झाली. त्यापूर्वी श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा सकाळी 11.30 वाजता, बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांच्या हस्ते झाली.