आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hot Dancer Yana Guptra And Nil Nitin Mukesh Rain Dance In Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळावर उतारा अर्धनग्न ‘रेन डान्स’चा; याना गुप्ता, नील नितीन सह कलाकार नाचणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आसाराम बापू यांच्या ‘रंगपंचमी’ला महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असली तरी पुण्यात मात्र चित्रपट चित्रीकरणाच्या नावाखाली ‘रेन डान्स’ला परवानगी देण्यात आली आहे. ‘हॉट’ दृश्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री याना गुप्ता, नील नितीन मुकेश यांच्यासह शंभर कलाकार यात सहभागी होणार आहेत.
पुणे-नगर रस्त्यावरील गंगा रिट्रीट रिसॉर्टवर सोमवारी बॉलीवूडचे कलाकार रेन डान्सच्या निमित्ताने पाण्याच्या फवार्‍यामध्ये नाचणार आहेत. दुष्काळात महाराष्ट्र होरपळत असल्याने कोरड्या रंगांनी होळी खेळण्याचे आवाहन सर्व स्तरांवरून होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.