आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hot Weather In Maharashtra Hits Election Campaign

निवडणुकीसह वातावरणही तापलं, त्यानं नेत्यांना प्रचारात गाठलं, पाहा छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्रात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. निवडणुकीचा फिव्हर चढत असताना आता वातावरणही गरमागरम होत चालले आहे. त्यामुळेच राजकीय नेते कोणतेही पर्वा न करता आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या कामाला जोरदार लागल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्वच पक्षातील बडे नेते जबरदस्त अशा प्रचारसभा, रॅली, रोड शो करीत आहेत. कायम एसी आणि कारमध्ये फिरणा-या नेत्यांची लोकसभा निवडणूक मात्र 'घाम' काढत आहे.
महाराष्ट्राचे अनेक भागातील तापमान सध्या 42 डिग्री सेल्सियस इतके वाढले आहे. मराठवाड्यासह विदर्भात उन्हाचा चटका बसू लागला आहे. पुण्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी दिवसात तापमानात वाढ होत जाईल. महाराष्ट्रात येत्या 10 तारखेला विदर्भात, तर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात 17 एप्रिलला मतदान होणार आहे. कोकणसह मुंबई व उत्तर महाराष्ट्रात 24 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे वातावरणातील उष्मा वाढणार आहे. त्याचबरोबर नेत्यांना चांगलाच घाम फुटणार आहे.
याचा प्रत्यय नुकताच अकोल्यातील सभेत आला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराला राज्यातील बड्या नेत्यांची पटलन हजर होती. मात्र अकोल्यात तापमान 41 डिग्री सेल्सियस असल्याने उपस्थित असलेले नेते शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र दर्डा यांचा घाम काढला.
पुढे पाहा छायाचित्रे...