आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hotel Kohinoor Theft, 37 Lacs Rupees Loot From Hotels

पुणे: हॉटेल कोहिनूरमध्ये जबरी चोरी, चोरट्यांचा 37 लाखांवर डल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील मध्यवर्ती भागातील आपटे रोडवरील हॉटेल कोहिनूर एक्झिक्यूटीव्हच्या तळमजल्यावरून चोरट्यांनी तिजोरी उचलून नेऊन 37 लाखांचा डल्ला मारला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मंगळवारी सकाळी ही बाब उजेडात आली. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने अज्ञातांविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, आपटे रोडवर असलेल्या कोहिनूर हॉटेलचे मालक मधुकर कोकणे हे मुंबईत राहतात. ते अधून-मधून पुण्यात येतात. दरम्यान, या काळात जमा झालेली रक्कम हॉटेल व्यवस्थापन हॉटेलच्या तळमजल्यावरील एका रूममध्ये तिजोरीत ठेवत असत. या तिजोरीची चावी फक्त व्यवस्थापकाकडेच असते. मात्र, मागील आठवड्याभरात दिवाळीच्या काळात हॉटेलचा चांगला व्यवसाय झाला होता. त्यातच दिवाळीमुळे हॉटेल मालकांना पुण्यात येता आले नव्हते. त्यामुळे मोठी रक्कम हॉटेलच्या तिजोरीत होती.
सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी ही तिजोरीत उचलून नेली व त्यातील 37 लाखांच्या पैशांवर डल्ला मारला. मंगळवारी सकाळी हॉटेलच्या कर्मचा-यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती हॉटेल व्यवस्थापन व मालकाला दिली. यानंतर व्यवस्थापकाने डेक्कन पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डेक्कन पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिस हॉटेलच्या कर्मचा-यांचीही चौकशी करीत आहेत.