आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Can Corruption End By Broom, Ramdev Critise On Aap

एकात्मता खंडित करू पाहणारे भ्रष्टाचारावर काय झाडू फिरवणार, रामदेव बाबा यांचा 'आप'ला टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘काँग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी झाली असून आम आदमी पार्टी म्हणजे टेपरेकॉर्डर आहे. राष्‍ट्रीय एकात्मता खंडित करू पाहणारे पक्ष भ्रष्टाचारावर काय ‘झाडू’ फिरवणार? देशाच्या एकतेवर झाडू फिरवण्याचाच त्यांचा डाव आहे,’ अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी ‘आप’वर टीका केली.
इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना रामदेव बाबा यांनी केजरीवाल, काँग्रेस व यूपीए सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने 32 प्रकारचे कर लादून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे. एफडीआय किंवा सेन्सेक्स देश चालवत नाहीत, तर जनता देश चालवते. त्यासाठी अर्थक्रांती करण्याची गरज आहे. ‘आप’चे नेते काश्मीरमध्ये लोकांचा कौल घेऊन तेथील सैन्य मागे घेण्याची भाषा करतात. या लोकांनी भारतात राहायचे की पाकिस्तानात जायचे, तेही जाहीर करून टाकावे. स्थानिक मुद्दे घेऊन दिल्लीत ‘आप’ सत्तेवर आले. केजरीवाल यांनी साध्या राहणीचा डांगोरा पटत 10 खोल्यांचे घर मिळवले. नंतर दिल्लीकरांच्या दबावामुळे परत केले. आम्ही अण्णा हजारे यांच्यासह केजरीवाल यांना 14 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिक व्यासपीठावर आणले. त्याअगोदर अण्णांना उत्तर भारतीय लोक ओळखत नव्हते.
राष्ट्रवादी ‘रालोआ’त येईल
गांधी नावामुळे राहुल गांधी राजकारणात पुढे आले आहेत. मात्र, पंतप्रधानपदासाठी त्यांचे नाव समोर केल्यास शरद पवारसुद्धा ‘यूपीए’तून बाहेर पडतील. आगामी निवडणुकीत भारत स्वाभिमानचे लोक उतरणार असून राहुल व सोनिया गांधी या निवडणुकीत पराभूत होतील. देशाचे आगामी सरकार चांगले बनणार असून त्यात भाजप, शिवसेना, राष्‍ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, चंद्राबाबू नायडू यांचा समावेश असेल. त्यासाठी थोडी वाट पाहा, असे भाकितही त्यांनी वर्तवले.