आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Common People Brought Rdx Says Baig Advocate

जर्मन बेकरी स्‍फोट: आरडीएक्स सामान्य माणसाकडे येईल कसे?, बेगच्या वकिलांचा प्रश्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बचाव पक्षाचे अ‍ॅड. ए. रहमान म्हणाले, बेग हा कधीच जर्मन बेकरीत गेला नसून त्याचा या कटाशी कोणताही संबंध नाही. यासीन भटकळ याने बेकरीत बॉम्ब ठेवल्याचे एटीएसने सांगितले, पण त्याला ते न्यायालयात सादर करू शकले नाहीत किंवा त्याविषयी कोणताही पुरावा सादर केला नाही. कोलंबो येथे फय्याज कागजी व मोहसीन चौधरी यांनी हा कट रचला असून त्याबाबत तपास करण्यासाठी तपास अधिकारी कधी कोलंबोला गेले नाहीत. घटनेच्या दिवशी बेग पुण्यात नसल्याचे सहा साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणात अबू जिंदाल याला पोलिसांनी कोर्टात अद्याप हजर केलेले नाही. बेगबाबतचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नाही. आरडीएक्स हे केवळ लष्करात असते, ते सामान्य माणसाकडे येईल कसे ?

... म्हणे बेगचे वय कमी
हिमायत बेग कमी वयाचा व गरीब घरचा आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणतेही आरोप दाखल नाहीत. तो इंडियन मुजाहिदीन, लष्कर- ए- तोयबा या अतिरेकी संघटनांचा सदस्य नसून तपास अधिका-यांनी तसा गैरसमज पसरवला आहे, असे सांगत अ‍ॅड. रहमान यांनी बेगला वाचवण्याचा प्रयत्न केला.