आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Digital Indians: How Ruchi Sanghvi Engineered Her Rise

ही आहे फेसबुकची पहिली महिला इंजीनिअर, \'सिलिकॉन स्टार\' म्‍हणून ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुची सांघवी - Divya Marathi
रुची सांघवी
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी फेसबुक कार्यालयाला भेट दिली. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com आज तुम्‍हाला सांगणार आहे. फेसबुकच्‍या पहिल्‍या इंजीनिअर विषयी. जी की पुण्‍यातील रहिवाशी असून, आपल्या कतृत्त्वाच्या जोरावर मोठी उडी घेऊन समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे. 'सिलिकॉन स्‍टार' म्‍हणून आज सबंध जगात तिला ओळखले जाते. रुची सांघवी असे तिचे नाव आहे.

'न्यूज फीड'ची आयडिया रुचीच्याच डोक्‍यातून
रुची हिने 'फेसबुक'ला यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 'फेसबुक'ची पहिली महिला इंजिनिअर होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. रुची ही 'फेसबुक'च्या पहिल्या 10 इंजिनिअर्समध्ये एकमेव महिला होती. फेसबुकमध्ये कार्यरत असताना रुचीने अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. 'फेसबुक'चा वादग्रस्त फीचर 'न्यूज फीड'ची आयडिया रुचीच्या सुपिक डोक्यातून बाहेर आली होती. सन 2005 मध्ये फेसबुकमध्ये रुजू झाल्यानंतर 'फेसबुक'चा संस्थापक झुकरबर्ग आणि त्याचे सहकारी यूजर्सला साइटवर खिळवून ठेवण्यासाठी आयडिया शोधत होते. तेव्हा रुचीने एका न्यूज पेपरसारखी आयडिया दिली. रुची हिची 'न्यूज फीड'ची कल्पना मार्क खूप आवडली. नंतर फेसबुकवर 'न्यूज फीड' अस्तित्वात आले. एकट्या या फीचर्सच्या माध्यमातून 'फेसबुक'ला दर तासाला 50 हजार नवे यूजर्स मिळाले.

का दिला फेसबुकचा राजीनामा ?
आपली स्‍वत:ची कंपनी सुरू करण्‍यासाठी सन 2010 मध्ये रुचीने 'फेसबुक'चा राजीनामा दिला. पुढे पतीसोबत स्वत:ची 'कोव्ह' ही नवी कंपनी सुरू केली. नंतर फेब्रुवारी 2012 मध्ये 'कोव्ह'ला 'ड्रॉपबॉक्स' नामक कॉम्प्युटर डाटा शेअरिंग कंपनीने खरेदी केले. रुची सध्या या कंपनीची व्हाइस प्रेसिडेंट आहे. रुचीला 'सिलिकॉन व्हॅली स्टार' म्हणून संबोधिले जाते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा रुचीचे निवडक फोटोज...