आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HRD Minister Dr. Pallam Raju At D Y Patil, Akurdi Pune

संशोधनात्मक आणि मूल्याधारित शिक्षणावर भर देण्याची गरज - डॉ. पल्लम राजू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जागतिकीकरणाच्या व भांडवलशाहीच्या जगात भारतासारख्या विकसनशील देशातील उद्योगांच्या भरभराटीसाठी कौशल्यावर आधारित शिक्षणव्यवस्था हवी आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक व तयार असे मनुष्यबळ उपलब्ध होईल. याचबरोबर संशोधन व मूल्यधारित शिक्षणावर भर देताना उत्कृष्ट शिक्षक तयार करण्याबरोबर आधुनिक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच हीच शैक्षणिक संस्कृती जोपासत नव्या पिढीला अधिक वाव द्यायला पाहिजे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. एम. एम. पल्लम राजू यांनी व्यक्त केला.
पल्लम राजू म्हणाले, 'आपल्या शिक्षण व्यवस्थेने काही साध्य केले असले तरी बरेच काही साध्य करणे बाकी आहे. बदलत्या काळानुसार बदल स्वीकारले पाहिजेत. जर असे झाले तर भारत झपाट्याने प्रगती करेल. याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये गुणवत्ता मिळवण्याबरोबर गरेजनुसार व्यावसायाभिमुख मनुष्यबळ तयार गेले पाहिजे. मात्र हे करीत असताना मूलभूत विज्ञानाकडे दुर्लक्ष होता कामा नये. मूलभूत विज्ञानाने जग बदलण्याची क्षमता आहे, विकासाचे विविध टप्पे पाहिले तर हे सहज तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे सर्व शिक्षणव्यवस्थेचा समतोल साधला पाहिजे.
पल्लम राजू पुढे काय म्हणाले, आणखी वाचा पुढील स्लाईडवर...