आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HSC RESULT: बारावीच्या ऑक्टोबर परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सप्टेंबर-ऑक्टोबर 2015 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे, असे मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना त्यांचे विषयनिहाय गुणही उपलब्ध होतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल. गुणपत्रिकांचे वाटप 20 नोव्हेंबर रोजी दुपारी नंतर कनिष्ठ महाविद्यालयात केले जाईल. गुणांची पडताळणी, पुनर्मूल्यांकन, छायाप्रती श्रेणी-गुणसुधार यासाठीचे अर्जही संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.