आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Husband And His Family Set A Fire Wife In Daund Taluka

‘धाेंडा’ न मिळाल्याने प्राध्यापिकेला जाळले, पती व कुटूंबाचा हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - अधिक मासात दोन तोळे साेन्याची अंगठी, लाॅकेट व गाडी अाहेरात द्यावी, अशी मागणी जावयाने केली होती. पण ही मागणी सासुरवाडीकडून पूर्ण न झाल्यामुळे एका पतीने व त्याच्या कुटुंबीयांनी अापल्या प्राध्यापिका पत्नीस जाळले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथे साेमवारी ही घटना घडली. विवाहित महिला धनश्री रोहन दिवेकर (२५) ही ८५ टक्के भाजली असून तिच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राेहन दिवेकर व धनश्री यांचा दाेन वर्षांपूर्वी विवाह झाला हाेता. ती सध्या बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान संस्थेत प्राध्यापिका अाहे. या दांपत्याचा पहिलाच अधिक मास हाेता. सासुरवाडीकडून साेन्याचे दागिने व गाडी मिळावी असा राेहनचा हट्ट हाेता. मात्र, धनश्रीचे कुटुंबीय ही मागणी पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे राेहन व त्याच्या कुटुंबीयांनी धनश्रीला पेटवल्याची तक्रार पाेलिसांत दाखल झाली अाहे. पाेलिसांनी धनश्रीचे सासरे रावसाहेब दिवेकर, सासू अरुणा, पती रोहन यांच्यावर गुन्हा दाखल केला अाहे. सासू व पतीला अटक केली असून सासरा फरार अाहे.