आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोणी काळभोर येथे कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या करून पतीने घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूवर्णा किसन कांबळे - Divya Marathi
सूवर्णा किसन कांबळे
पुणे- जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे आज (बुधवार) पहाटे पतीने पत्नीचा खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. सूवर्णा किसन कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव किसन रामा कांबळे असे आहे.
 
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूवर्णा व किसन या दाम्पत्यांत मागील सात वर्षांपासून कौंटुबिक वाद सुरु होते. परिणामी दोघे वेगवेगळे राहत होते. पंधरा दिवसांपूर्वीच किसन हा पत्नीकडे राहायला आला होता. किसन आणि सूवर्णा यांना दोन मुली व एक मुलगा आहे.
 
बुधवारी पहाटे किसन याने सुवर्णाच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने मारहाण करून तिचा खून केला. नंतर त्याने  स्वत: सूवर्णाच्या घरापासून जवळच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत पिंगुवले व शिवाजी ननवरे अधिक तपास करीत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...