आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधांचा संशय; पतीने केली पत्नीसह मुलाची हत्या, आरडा-ओरड केल्याने मुलगी वाचली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लाेणावळ्याजवळील कान्हे फाटा येथे पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीसह मुलाचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली, तर मुलीस वाचवण्यासाठी अालेल्या शेजाऱ्यावरही आरोपीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर अाराेपी स्वत:हून पाेलिस ठाण्यात हजर झाला.  
 
रजनी वसंत सातकर (३८), मुलगा अनुष वसंत सातकर (१३) अशी मृतांची नावे आहेत, तर मुलगी श्रावणी वसंत सातकर (९) अाणि शेजारी गणेश अांबेकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. याप्रकरणी वसंत गाेपाळ सातकर याला अटक करण्यात आली आहे.   
 
वसंत सातकर हा महिंद्रा कंपनीत कामगार असून तो कुटुंबासह कान्हे फाटा येथे वास्तव्यास आहे. वसंतला रजनी हिचे एका व्यक्तीसाेबत अनैतिक संबंध असल्याचा संशय हाेता. यावरून दोघांत अनेकदा वाद झाले होते. साेमवारी  पहाटे वसंत व रजनी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याने पत्नी व मुलावर धारदार शस्त्राने वार केले. आवाज ऐकून मुलगी श्रावणीने घराबाहेर येऊन आराडाओरड केली. त्यामुळे   शेजारी आंबेकर तिथे आले असता त्याने त्यांच्यावरही वार करून जखमी केले. घटनेनंतर आरोपी स्वत:हून पोलिसांत दाखल झाला.
बातम्या आणखी आहेत...