आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकमुळे पती मागतो काडीमोड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - एखाद्या सोशल साइटवरून पती-पत्नीमध्ये वाद उद्भवू शकतील आणि ते प्रकरण थेट घटस्फोटापर्यंत जाईल, असा विचार दहा वर्षांपूर्वी कुणी केला असता? कदाचित नाही; परंतु अशी प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. पुण्यात पत्नीने आपले फोटो फेसबुकवर अपलोड केले नाहीत म्हणून संतापलेल्या एका पतिराजांनी थेट काडीमोड घेण्यापर्यंत मजल मारली. समुपदेशनानंतर सुदैवाने घटस्फोट टळला तरी सोशल साइट्सही आपल्या खासगी जीवनाच्या किती भेदक अंग झाल्या आहेत, याची प्रचिती आली.

मैत्रिणीशी जवळीक
पत्नीने आपले फोटो फेसबुकवर अपलोड न करता लग्नापूर्वी मैत्रिणींसोबत सहलीवर गेल्याचे फोटो केले, ही पतिराजांची तक्रार होती. एवढेच नव्हे तर विशिष्ट मैत्रिणीशी पत्नी चॅटिंग करते आणि तिच्याशी जवळीक करते म्हणूनही ते नाराज होते. हे प्रकरण एवढय़ावरच थांबले नाही. पतीने पुण्याच्या महिला सहायता कक्षात तक्रार करून घटस्फोटासाठी अर्जही केला.

मुलांचा तरी विचार करा
दांपत्याला दोन मुले आहेत. घटस्फोटाचा अर्ज आल्यानंतर पुण्यातील महिला कक्षाच्या पोलिसांनी समुपदेशनाचे प्रयत्न केले. ‘दोन मुले आहेत, त्यांचा तरी विचार करा..’ असा सल्ला दोघांना देण्यात आला. मुलांसाठी एकत्र राहण्याचे त्यांनी कबूल केले असले तरी भावनिकदृष्ट्या त्यांनी फारकतच घेतली असल्याचे पोलिस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितले.

डॉक्टर पत्नीचा अर्ज
पुण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टर दांपत्याच्या लग्नास 14 वर्षे झाली आहेत. एक मुलगा दत्तक घेतला. पतीचे रुग्णालयातील रिसेप्शनिस्टशी संबंध असल्याची पत्नीची तक्रार आहे. यातून तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. डॉक्टर पती दारू पिऊन त्रास देतात, पोर्न सीडी पाहतात, असेही तक्रारीत नमूद आहे. सहायता कक्षाने समेटाचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही.

अजब वाद
पत्नीने फोटो अपलोड न केल्याचा राग, महिला सहायता कक्षात समुपदेशनानंतर तोडगा