आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Will Resign, Nana Patekar Clear Stand On FTII Issue

मी राजीनामा दिला असता, एफटीआयआयच्या वादावर नानांची स्पष्टोक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गजेंद्र चौहान यांना मी व्यक्तिश: ओळखत नाही; पण त्यांच्या जागी या पदावर मी असतो तर लगेच राजीनामा दिला असता. तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी या पदावर नेमले आहे; पण जर विद्यार्थ्यांनाच तुम्ही नको आहात, हे विद्यार्थी सतत सांगत आहेत, तर त्या जागेवर राहण्यात काय अर्थ, अशी स्पष्टोक्ती अभिनेते नाना पाटेकर यांनी शनिवारी येथे केली.

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीचा निषेध म्हणून विद्यार्थ्यांनी गेल्या २६ दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे. त्यावर कलावंत, नेते तसेच अन्य मंडळींपासून सारेच उलटसुलट विधाने करत आहेत. कलावंतांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत नाना पाटेकरांना विचारणा केल्यावर ते म्हणाले, ‘चौहान यांच्याविषयी मला फारशी माहिती नाही. माझ्या मनातील मूळ महाभारताची प्रतिमा पुसली जाऊ नये म्हणून मी टीव्हीवरचे महाभारत पाहिलेले नाही. मी अभिनय शिकण्यासाठी कुठल्या संस्थेतही गेलो नाही, कारण प्रत्येकाची ‘गीता’ वेगळी असते; पण विद्यार्थ्यांना आपण नको आहोत, हे जाहीरपणे सांगत असतानाही त्याच पदावर राहण्यात काय अर्थ आहे? मी असतो तर राजीनामा दिला असता..”

विद्यार्थ्यांनाही भरला दम
संपकाळात विद्यार्थ्यांनी गेल्या २५ दिवसांत अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नानाने नापसंती व्यक्त केली. आंदोलन दीर्घकाळ चालवून विद्यार्थी स्वत:चे नुकसान करून घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिक्षण सोडता कामा नये वा बंद पडता कामा नये. आमचे कान कोणत्या शिक्षकाने पिळावे, हे आम्हीही ठरवले नव्हते, तरी आम्ही शिकलो. जोवर विद्यार्थी चौहान यांचे काम पाहत नाहीत तोवर त्यांना ते स्वीकारतील कसे, असा सवाल करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये, असेही बोल त्याने सुनावले.