आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याला सतर्कतेचे आदेश; दहशतवादाच्या मुकाबल्यासाठी \'एक मिनिट अभियान\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह संचारला आहे. ढोल-ताशांच्या गजरात राज्यासह देशात गणरायाचे आगमन होत आहे. आजपासून पुढील दहा दिवस लाडक्या गणरायाच्या आगमनाने भक्तीमय होऊन जातील. 18 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असून त्या दिवशी गणेशाचे विसर्जन होईल. मुंबई आणि पुण्यात गणपती विसर्जना दिवशी सर्व रस्ते माणसांनी फुलून जातात. गणेश भक्तांचा अविरत उत्साह त्यादिवशी पाहायला मिळतो. मात्र, या गणपती विसर्जनावर दहशतवादाचे सावट गेल्या काही वर्षांपासून घोंघावत आहे. यंदाही केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्य सरकारसह सर्व तपास यंत्रणांना सावधानतेचा इशार देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समोवारी दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेच्या सुचना मिळाल्यानंतर राज्यात मुंबई-पुण्यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारने अशा घटनांचा मुकाबला करण्यासाठी 'एक मिनिट अभियान' हे विशेष अभियान राबवण्यास सुरवात केली आहे.