आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे स्फोट प्रकरणात अटक बेकायदेशीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट 2012 रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी संशयितांना बेकायदा अटक करण्यात आली. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावे, असा अर्ज आरोपींच्या वकिलांनी मंगळवारी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.बांबर्डे यांच्याकडे सादर केला. या अर्जावर 11 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

आरोपीचे वकील मेहमूद पराचा यांनी न्यायालयात सांगितले की, जंगली महाराज रस्ता साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची तीन वेळा बेकायदा पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. त्यांना न्यायदंडाधिका-यांनी 15 दिवसांची कोठडी दिली, परंतु त्यांना कोठडी देण्याचा अधिकार नाही. या प्रकरणात बेकायदा अटक केल्याने त्यांना सोडून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.

खटला मुंबईला हलवा
विशेष सरकारी वकील राजा ठाकरे म्हणाले की, आरोपींना बेकायदा कृत्यासाठी अटक करण्यात आली असून त्यांना पोलिस कोठडी देण्याचा अधिकार न्यायदंडाधिका-यांना आहे. आरोपींवर मोक्काअंतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, हा खटला मुंबईत चालवण्याची मागणी एटीएसतर्फे करण्यात आली.