आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबारामती - बारामतीच्या उच्चपदस्थ अधिकार्याच्या संपत्तीचे घबाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत समोर आले. मात्र व्यापार्यांकडून विक्रीकर वसूल करताना पत्नीच्या आग्रहास्तव आयुक्ताने कोट्यवधींची संपत्ती जमा केली आहे. त्यामुळे अधिकार्यासोबत त्याच्या लोभी पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
मूळचे ढेकळवाडी (ता.बारामती) येथील विठ्ठल कृष्णाजी पिंगळे हे सध्या सातारा येथे विक्रीकर आयुक्त पदावर कार्यरत आहेत. 37 वर्षांच्या सेवेत त्यांनी 1 कोटी 37 लाख 93 हजार 973 रुपयांची संपत्ती जमवली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कारवाईत पिंगळे यांनी अतिरिक्त संपत्ती संपादित केल्याचे निष्पन्न झाले. ही संपत्ती त्यांनी पत्नीने प्रोत्साहन दिल्याने जमवल्याचे तपासात पुढे आले आहे.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विठ्ठल कृष्णाजी पिंगळे (वय 57) व त्यांची पत्नी विजया विठ्ठल पिंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पिंगळे यांच्या संपत्तीविषयी आणखी शोध घेतला जात आहे.
अधिकार्याची माया
2005 >5 8, 49, 914
2006 >5 9, 75, 706
2007 >5 10, 86, 778
2011 >5 17, 02, 200
2012 >5 52, 34, 412
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.