आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Julay Heavy Rain Fall Met Department Estimation

दिलासा देणारा पाऊस जुलै महिन्यात, हवामान विभागाचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - दुष्काळात होरपळलेल्या राज्याला जूनमध्ये दिलासा देणारा पाऊस जुलै महिन्यात धुवाधार बरसणार आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वाधिक पाऊस असेल. जुलैच्या सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. दुसरीकडे, राज्यातील निम्म्या पेरण्या आटोपल्या आहेत. धरणांमधील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे. गतवर्षी जूनअखेर राज्यात 13 टक्के असलेला पाणीसाठा यंदाचा जून संपल्यावर 26 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोकण व विदर्भातही पावसाने जुनची सरासरी साधली आहे. सोलापूरच्या ८, तर नगरच्या दोन तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे.


जुलैत पाऊस वाढणार
तीन वेगवेगळ्या ‘मॉडेल्स’चा आधार घेत जुलैतील पाऊस वाढण्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली. जुलैत सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता 28 टक्के आहे, तर सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता 36 टक्के असल्याचा निष्कर्ष या ‘मॉडेल्स’वरून काढण्यात आला आहे.


मराठवाड्यावर अवकृपा
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. उर्वरित सातही जिल्ह्यांत पावसाची स्थिती असमाधानकारक आहे. मराठवाड्यातील 35 तालुक्यांमध्ये पावसाने अजून सरासरी गाठलेली नाही.


छोट्या धरणांतील पाणीसाठा वाढला
लहान-मध्यम धरणांमधील 15 ते 30 टक्क्यांपर्यंत पोहोचला.
गंगापूर
25%
कोयना
49%
भंडारदरा
17%
दारणा
28%
मुळा
08%
47%
पेरण्या जूनअखेर
134.69
लाख हेक्टर राज्याचे सरासरी खरीप क्षेत्र
63.66
लाख हेक्टर (47%) पेरण्या जूनअखेरपर्यंत
23.65
लाख हेक्टर कापूस लागवड
19.38
लाख हेक्टरवर सोयाबीन