आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू; आठ लाखांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शेतात गवत कापणीसाठी गेलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील मंगरूळ पारगाव येथे शनिवारी घडली. या घटनेत सगुणाबाई खराडे (७०) यांचा मृत्यू झाला. जनावरांसाठी चारा आणण्यासाठी त्या गवत कापण्यासाठी शेतात गेल्या होत्या. बराच वेळ झाला तरी त्या परत आल्या नाहीत म्हणून कुटुंबीयांना शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेनंतर गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांना घेराव घातला. दरम्यान, पुन्हा अशी घटना होऊ नये याची काळजी घेऊ, असे आश्वासन जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक व्ही.ए. धोपटे यांनी दिले. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सगुणाबाई यांच्या वारसांना राज्य शासनाकडून नुकसानभरपाई म्हणून आठ लाखांची रक्कम मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...