आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Marathi Sahitya Sammelan 275 Stalls Installed

साहित्य संमेलन: ग्रंथप्रदर्शनात 275 स्टॉल्स लागणार, अडीच कोटींची विक्री अपेक्षित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनात सुमारे अडीच कोटी रुपयांची ग्रंथविक्री होईल, असा आयोजकांचा अंदाज आहे. दरवर्षी लाखो वारक-यांची पदचिन्हे मिरवणा-या पालखीतळ मैदानावर ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने आता लक्षावधी पुस्तकांचा तळ उभारला जाणार आहे.


सासवड येथे 87 वे साहित्य संमेलन होणार आहे. दरवर्षी संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाविषयी वाचकांना उत्सुकता असते. त्यामुळे आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळाच्या वतीने गुरुवारी संमेलनातील ग्रंथप्रदर्शनाची माहिती देण्यात आली. संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनात 275 स्टॉल्स असतील. एका प्रकाशकाला अधिकाधिक चार सलग गाळे मिळू शकतील. प्रत्येक गाळ्याचे तीन दिवसांसाठी 4500 रुपये भाडे असेल. 275 गाळ्यांपैकी दहा गाळे आयोजकांकडे राखीव राहतील. गाळ्यांच्या आरक्षणासाठी 14 ते 30 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल. संमेलनाच्या संकेतस्थळावर नोंदणीसाठीचा अर्ज उपलब्ध असून, तो डाऊनलोड करून पाठवता येईल. गाळ्यांची सोडत 16 नोव्हेंबर रोजी साहित्य परिषदेत काढण्यात येईल, असे स्वागताध्यक्ष विजय कोलते यांनी सांगितले.


साहित्य संमेलन आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला भरणार आहे. याचे औचित्य साधून आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने चित्रमय अत्रे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचे ठरविले आहे. प्रदर्शनात अत्रेंचे सर्व साहित्य, दुर्मिळ छायाचित्रे, भाषणे मांडण्यात येतील. 1998 मध्ये शासनाने अत्रे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रदर्शन भरवले होते. त्याच धर्तीवर हे प्रदर्शन असेल.