आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • In Party, There Is Lots Of Leaders But Not Workers Bhaskar Jadhav

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘पक्षात नेतेच फार अन् कार्यकर्ते कमी' , राष्‍ट्रवादीचे प्रदेशाध्‍यक्ष भास्‍कर जाधव यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘पक्षात नेतेच फार अन् कार्यकर्ते कमी झाले आहेत. जो येतो तो पद मागतो. व्यक्तीभोवती घोटाळणा-या नेत्यांपेक्षा पक्षाशी बांधिलकी असलेले कार्यकर्ते हवे आहेत,’ या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी शनिवारी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला.


पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड आदींच्या उपस्थितीत आयोजित पदाधिका-यांच्या बैठकीत जाधव यांनी पक्षातील अपप्रवृत्तींवर हल्ला चढवला. विरोधकांकडे कोणतीही सत्ता नसताना त्यांचे 25- 30 खासदार, साठ-साठ आमदार कसे काय निवडून येतात? आपल्याकडे सत्ता असेल तरच पक्ष पाहिला जातो. टाळ्या वाजवायलासुद्धा माणसे भाड्याने आणावी लागतील. काही जिवंतपणा आहे की नाही?’ अशी उद्विग्नता जाधव यांनी व्यक्त केली. पक्ष सत्ताकेंद्रित ठेवता कामा नये. संघटना वेगळी ठेवा आणि सत्ता वेगळी ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.


लोकप्रतिनिधी झाले मालक : आव्हाड
आव्हाड यांनीही राष्ट्रवादीतले लोकप्रतिनिधी मालक झाल्यासारखेच वागत असल्याची टीका केली. ‘राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष असल्याचे सांगत आपणच पाठ थोपटून घेतो. कुठे आहे नंबर एकचा पक्ष? दिल्लीत चार नंबरवर, विधानसभेत दोन नंबरवर. तुम्ही काही करणार की नाही. गेल्या निवडणुकीत शिरूर, मावळ लोकसभेची जागा तुमच्यामुळेच गेली,’ असा आरोप आव्हाड यांनी पुण्यातील पदाधिका-यांवर केला.


बीडमध्ये ‘फिक्सिंग’ : अजित पवार
बीड लोकसभेत भाजपचा उमेदवार निवडून येतो. त्याच जिल्ह्यातल्या विधानसभेच्या शंभर टक्के जागा ‘राष्ट्रवादी’ला मिळतात. यात काय ‘फिक्सिंग’ आहे ते समजत नाही. या पुढे असे होवू देऊ नका, असे अजित पवार म्हणाले.

ठली पन्नाशी
वाढलेली मागणी आणि घटलेली आवक यामुळे कांदादरात पुन्हा वाढ झाली. नाशिक जिल्ह्यात नामपूर बाजार समितीत शनिवारी प्रतिक्विंटलला 5 हजार 15 रुपये दर मिळाला. तर किरकोळ बाजारात कांदा 50 रुपयांवर गेला आहे. राज्याबाहेर हे दर 65 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. सप्टेंबरअखेरपर्यंत दरात तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत.
सध्याच्या ढगाळ हवामानामुळे कांदा खराब होत असून राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील कांदा संपलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांद्यावरच देशाची मदार असल्याने दर वाढत आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सध्या लाल कांदा बाजारात येत आहे, मात्र तो अजून परिपक्व झालेला नाही. त्यामुळे स्थानिक कांदा पन्नास रुपये किलो दराने
खरेदी करावा लागत आहे.
कांदाभजी महाग
कांदा दरवाढीमुळे हॉटेलातही कांदा देताना हात आखडता घेतला जात आहे. त्याचप्रमाणे कांदाभजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ क रण्यात आली आहे. काही हॉटेलमध्ये तर कांदा एकदाच मिळेल, असे थेट बोर्ड लावण्यात आले आहेत. पाववड्यासोबत मिळणारा कांदाही बंद झाला आहे.