आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 63 वर; मृतांच्या वारसांना पाच लाख!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -आंबेगाव तालुक्यातील माळीण येथे बुधवारी झालेल्या दुर्घटनेनंतर मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. मृतांच आकडा 63 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 10 जणांना वाजवण्यात राष्‍ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला (एनडीआरएफ) यश मिळाले आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शुक्रवार) ही माहिती दिली.

दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासन करेल. तसेच माळीण गावाचे प्राधान्याने पुनर्वसन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे. माळीण येथे मदत व बचाव कार्य वेगाने सुरू असून मुख्यमंत्री स्वत: या कार्याची सातत्याने माहिती घेत आहेत. दुर्घटनाग्रस्ताना सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

माळीण येथे ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. परंतु दुर्घटनाग्रस्त परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. माळीण परिसरात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दरम्यान, दुर्घटनेत अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 47 घरे पूर्णपणे जमिनदोस्त झाले आहेत. ढिगार्‍याखाली 100हून अधिकजण अजूनही अडकून पडल्याची भीती आहे.

माळीण गावात डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर दिवसेंदिवस येथील चित्र विदारक होत असल्याची स्थिती आहे. ढिगारा उपसण्याचे काम अविरत सुरू असून त्यातून मृतदेह मिळत आहेत. आतापर्यंत 50 हून अधिक मृतदेह याठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत. तर आत किती लोक दबलेले आहेत, याबाबत मात्र निश्चित अंदाज अजूनही लागत नसल्याचे दिसूत येत नाही. गावाचा विचार करता सगळीकडे मृताच्या नातेवाईकांचा आक्रोश दिसून येत आहे. तर दुर्घटनेला सुमारे तीन दिवस उलटून गेलेले असले, तरी नातेवाईकांच्या आशाळभूत नजरा आपल्या आप्तेष्ठांचा शोध घेण्यासाठी भिरभिरावत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, गावातील काही ताजी छायाचित्रे...