आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणात पैसा झाला वरचढ : मनोहर पर्रीकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- बदलत्या काळात राजकारणाची स्थिती सुधारणे सोपे नाही. कारण राजकारणात पैसा वरचढ झाला आहे. अशा वेळी कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या न्यायव्यवस्थेकडूनच फक्त स्थितीत बदल घडवण्याची अपेक्षा आहे. लोकशाही टिकवण्यात व लोकांना योग्य दिशा देण्यात वकिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी व्यक्त केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आयोजित ‘राज्यस्तरीय वकील परिषदेत’ ते बोलत होते. या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, गोव्याचे महाधिवक्ता आत्माराम नाडकर्णी, खासदार वंदना चव्हाण, बार कौन्सिल अध्यक्ष विठ्ठल देशमुख उपस्थित होते.

पर्रीकर म्हणाले, लोकशाही न्यायव्यवस्थेवर लोकांचा प्रचंड विश्वास असून त्यामुळे वकिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. न्यायालयात दिलेल्या निणर्याची काळजीपूर्वक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. अशी अंमलबजावणी होणार नसेल तर असे निर्णय देण्यात येऊ नयेत. सर्वोच्च न्यायालयाने नोकरी, भ्रष्टाचाराबाबत मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत, पण ती आपण विसरलो आहोत.
देसाई म्हणाल्या, देशाची घटना हा एक अमूल्य ठेवा असून तो दिशा देणारा महामंत्र आहे. लोकांच्या मूलभूत हक्कांची शासनाकडून पायमल्ली होत असताना ते रोखण्याचे काम न्यायसंस्था अखंडपणे करत आहे. लोकशाहीचे खरेखुरे संरक्षक वकील असून घटनेच्या मूलभूत चौकटीस धक्का लागणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. महिलांनी न्यायसंस्थेत स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.