आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: बाणेरमध्ये 20 कुत्र्यांची हत्या, काहींना विष देऊन तर काहींना जीवंत जाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 कुत्र्यांना विष घालून तर 4 कुत्र्यांना जीवंत जाळले आहे. - Divya Marathi
16 कुत्र्यांना विष घालून तर 4 कुत्र्यांना जीवंत जाळले आहे.
पुणे- पॉश भाग म्हणून विकसित झालेल्या बाणेर भागात 20 भटक्या कुत्र्यांची हत्या करण्यात आली आहे. यातील काही कुत्र्यांना जीवंत जाळले आहे तर काहींना विष घालून मारून टाकण्यात आले आहे. 16 कुत्र्यांना विष घालून तर 4 कुत्र्यांना जीवंत जाळले आहे. आपल्या भागात भटक्या कुत्र्यांमुळे नामुष्की ओढावते म्हणून या कुत्र्यांना मारून टाकल्याचे समोर येत आहे. मात्र, या घटनेमुळे प्राणीप्रेमी चांगलेच नाराज झाले आहेत. मात्र, या कुत्र्यांची नेमकी कोणी हत्या केली हे अद्याप समोर आलेले नाही.
 
पुण्यात महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 50 हजार भटकी कुत्री आहेत. मात्र, काही स्वयंसेवीच्या माहितीनुसार हा आकडा 1 लाखाच्या घरात आहे.
 
यंदा पुण्यात सात हजार लोकांना कुत्रा चावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोकाट, भटक्या व आजारी कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. अशा कुत्र्यांना रेबीज सारखी इंजेक्शने देणे व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, त्यांना पकडून सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करणे असे पर्याय असताना आता 20 हून अधिक कुत्र्यांची हत्या केल्याने हळहळ व्यत्त केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...