आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याआधीही वादग्रस्त राहिले एएसआय; महिला नेमबाजाने केली होती आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा शिबीरात एका महिला नेमबाज खेळाडूच्या रुममध्ये पुरुष खेळाडू आक्षेपार्ह्य अवस्थेत आढळून आला आहे. यामुळे चर्चेत आलेले आर्मी स्पोर्टस् इन्स्टिट्यूट (एएसआय)याआधीही वादाचे केंद्र राहिलेले आहे.

आसामची आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रतिमा बोरा हिने 3 मे रोजी एएसआयमध्ये आत्महत्या केली होती. ती देखील राष्ट्रीय शिबीरामध्येच सहभागी होण्यासाठी आली होती. प्रतिमाने होस्टेलच्या रुममधील पंख्याला फास लावून आत्महत्या केली होती. या 20 वर्षीय खेळाडूने आत्महत्येसाठी बेडशीटचा दोरी म्हणून वापर केला होता. तणावामुळे आत्महत्या केल्याची शक्यता तेव्हा वर्तवण्यात आली होती.