आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्यांकडून सुरेश कलमाडी यांची स्तुती; माझे पहिले प्रेम पुणे- शत्रुघ्न सिन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कधीकाळी पुणे फेस्टिव्हलची देशभर प्रसिद्धी करणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचा राजकीय-सामाजिक प्रभाव सध्या ओसरला असला तरी त्यांनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिव्हलचे मात्र त्याच थाटात शुक्रवारी पुण्यात उदघाटन झाले. भाजपच्या मंत्र्यांनीदेखील या वेळी उपस्थित राहून कलमाडींची स्तुती केली.  

कलमाडींनी सुरू केलेला गणेश फेस्टिव्हल पुण्याची ओळख बनल्याची कबुली पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीही दिली.  पुणे फेस्टिव्हलच्या निमित्ताने अनेक महिन्यांनी कलमाडी पुण्याच्या सार्वजनिक जीवनात दिसले.  ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उदघाटन करण्यात आले.  महापौर मुक्ता टिळक, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार चंद्रकांत खैरे  उपस्थित होते.  
गणेश वंदना, कथ्थक, लावणी, पोवाडा अशा कार्यक्रमांनी सोहळ्याची झाली. व दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आनंद खांडेकर यांना फेस्टिव्हल पुरस्काराने गौरवण्यात आले. 

मी पुणेकर : शत्रुघ्न   
विद्यार्थिदशेतल्या पुण्यातील वास्तव्याला शत्रुघ्न सिन्हा यांनी उजाळा दिला. ‘जो शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वाढला, पुण्याच्या देवभूमीत आला त्या शत्रुघ्नला कधीही भाषेचा अडसर नाही,’ असे सांगत त्यांनी मराठी-हिंदी भाषेत संवाद साधला. माझे पहिले प्रेम पुण्याचे, मी पुण्याचा वफादार असल्याचे ते म्हणाले. सुभाष घई यांनीही पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूट माझे पहिले प्रेम असल्याचे सांगितले. प्रभात रोडने मला बायको दिल्याचे घई यांनी सांगताच हशा पिकला.   
बातम्या आणखी आहेत...