आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात इन्‍कम टॅक्‍स अधिका-याचा मृत्‍यू, 3 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्‍सेटमध्‍ये मृत आयकर अधिकारी अभिषेक त्‍यागी. - Divya Marathi
इन्‍सेटमध्‍ये मृत आयकर अधिकारी अभिषेक त्‍यागी.

पुणे-   जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पहाटे झालेल्‍या अपघातात इन्‍कम टॅक्‍सचे अधिकारी अभिषेक त्‍यागी यांचा मृत्‍यू झाला आहे. हा अपघात देहू रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अमरजाई मंदिरा जवळ झाला. त्‍यांच्‍या भरधाव तवेरा गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. अपघातामध्‍ये चालकासह आयकर विभागाचे अधिकारी आनंद उपाध्‍याय आणि कृष्‍णाकांत मिश्रा जखमी झाले आहेत.


सविस्‍तर वृत्‍त असे की, आयकर विभागाचे हे 3 अधिकारी काही कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा गाडीतून (एमएच १२ एफसी २६१५) येत होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर (एमएच ०६ के ७९४४) उभा होता. तवेरा चालकाला याचा अंदाज आला नाही. भरधाव असलेल्या तवेराने त्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. यात अभिषेक त्‍यागी यांचा जागीच मृत्यू झाला ते आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते, अशी माहिती आहे. उपसंचालक आनंद उपाध्याय, कृष्णकांत मिश्रा व चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...