आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्रामध्येच पेटला वैशाख वणवा; आणखी 5 दिवस उष्णतेची लाट कायम; विदर्भ 45 अंश पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- उष्ण-कोरड्यावाऱ्यांमुळे राज्यात पसरलेली उष्णतेची लाट ओसरण्याची कुठलीही चिन्हे नसून आगामी पाच दिवस हेच चित्र टिकून राहील, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, अकोला अशा शहरांनी ४५ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद केल्याने उष्ण शहरांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर परभणीचा पारा ४४, तर औरंगाबादचा ४१.६ वर गेला अाहे. राज्यात जळगाव ४४.६, मालेगाव ४२.२. सोलापूर ४३.२, उस्मानाबाद ४२.९, परभणी ४४, अकोला ४४.८, बीड ४३.४, अमरावती ४४.२, चंद्रपूर ४५.९, ब्रह्मपुरी ४४.२, गोंदिया ४३.५, नागपूर ४४, वाशीम ४३, वर्धा ४४.५, यवतमाळ ४३ अशी उष्ण शहरे नोंदवली गेली आहेत. 
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...