आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धबधब्याच्या पाण्यात पोलिसांनी साकारला तिरंगा, लोणावळा ग्रामीण पोलिसांची कल्पना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- 15 ऑगस्टचे औचित्य साधत मावळ तालुक्यातील भाजे लेणी येथील धबधब्याला तिरंग्याच रूप देण्यात आले. ही कल्पना आहे पोलिस कर्मचाऱ्यांची. हे पाहून पर्यटकांनी आश्चर्य व्यक्त केले. हे सर्व पाहून धबधब्याला कॅमेऱ्यात कैद करण्यात सर्वच पर्यटक दंग झालेत.

तळेगाव एमआयडीसी आणि लोणावळा ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्यांना भाजे लेणी येथील धबधब्याजवळ आज (मंगळवारी) पोलिस उपनिरीक्षक विक्रम पासलकर, हवालदार ठोंबरे, महिला पोलिस शिपाई खेडकर यांची ड्युटी लागली होती. त्यावेळी धबधब्यावरून पडणारे पाणी पाहून या सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांना कल्पना सुचली. ती म्हणजे  तिरंग्याची. वरून कोळणाऱ्या धबधब्याच्या पाण्यात केशरी आणि हिरवा हा रंग सोडत एक नयनरम्य असा पाण्यात तिरंगा तयार झाला आहे. या तिरंग्याने येथे आलेल्या तीन-चार हजार पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे सर्व पर्यटक आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात तिरंग्याचे दृश्य कैद केले. काहींनी तर व्हॉट्सअपवर फोटो शेअर केले. पोलिस कर्मचऱ्यांना सुचलेल्या कल्पने हजारो पर्यटकांनी कौतुक केले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...धबधब्यात साकारलेल्या तिरंग्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...